अयोध्या नगरात एकाच अपार्टमेंटमधे तिन घरफोड्या

On: December 26, 2022 10:08 PM

जळगाव : अयोध्या नगरातील श्रद्धा रेसिडेंसी या अपार्टमेंटमधे एकाच वेळी तिन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाले आहे. सुरक्षा रक्षकाच्या घरासह एकुण तिन बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. एकुण 3 लाख 53 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला असून त्यात एक लाख रुपयांसह सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.  

श्रद्धा रेसीडेंसी या अपार्टमेंटमधे संजय गोरखनाथ सिंग हे खासगी सुरक्षा रक्षक  परिवारासह राहतात. संजय सिंग यांची मुलगी सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल आहे. 25 डिसेंबरच्या रात्री साधारण पावणे नऊ वाजेच्या सुमारास संजय सिंग हे ड्युटीवर निघून गेले. त्यानंतर इतर सर्व सदस्य रात्री पावणे दहा  वाजेच्या सुमारास घरी आले. त्यावेळी हा प्रकार उघड झाला.

याच अपार्टमेंटमधील रहिवासी अशोककुमार विश्वकर्मा यांच्या घरातून 24 हजार रुपये किमतीचे 6 ग्रम वजनाचे मंगळसूत्र गायब झाले आहे. याशिवाय संतोषकुमार नागर यांच्या घरातून नेमका काय  ऐवज गेला हे समजू शकले नाही. संजय सिंग यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी भेट दिली. सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी सहायक पोलिस अधिक्षक संदीप गावीत यांनी सुचना दिल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment