विवाहीतेने घेतला गळफास – पती व सासुला अटक

On: December 29, 2022 9:19 PM

जळगाव : तांबापुरा परिसरातील विवाहीतेने मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या  घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्यात तिचा पती व सासु अशा दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील दोघांना उद्या न्यायायलयात हजर  केले जाणार आहे.

सना कुरेशी असे आत्महत्या करणा-या विवाहितेचे नाव असून फिरोज शेख युनुस शेख कुरेशी (रा. टिपू सुल्तान तांबापुरा जळगाव) आणि जैनब शेख युनस कुरेशी असे अटकेतील दोघांची नावे आहेत. विवाहीतेचे मालेगाव येथे राहणारे वडील सलीम खान लतीफ खान यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. सासरच्या त्रासाला वैतागून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गुन्हा उघडकीस आल्यानंतर लागलीच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील, सचिन मुंडे, इम्रान बेग आदींनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना अटक केली असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment