बस चालक वाहकास प्रवाशाची मारहाण

On: January 5, 2023 9:54 AM

जळगाव : मोबाईलवर मोठ्याने गाणे वाजवणा-या प्रवाशाला आवाज कमी करुन तिकीट काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने महिला बस वाहकास शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण करणा-या  तरुणाविरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रतिक जुलाल बागुल (रा. पिंप्री ता. चोपडा) असे गुन्हा दाखल व अटक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अडावद पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यानुसार रतिक बागुल हा महिला वाहकाकडे बघून मोबाईलवर मोठ्याने गाणे वाजवत होता. महिला वाहकाने त्याला मोबाईलचा आवाज कमी कर आणि व्यवस्थित तिकीट घे, तुझ्यापेक्षा माझी मुले मोठी आहेत असे म्हटले. महिला वाहकाच्या बोलण्याचा राग आल्याने रतिक बागुल या तरुणाने रागाच्या भरात महिला वाहकास बसच्या खाली ढकलून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.

हा वाद मिटवण्यासाठी आलेल्या चालकास देखील त्याने चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या चष्म्याचे नुकसान झाले. या घटने प्रकरणी अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत पाटील पुढील तपास करत असून संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment