जळगाव : महिला डॉक्टरसोबत विविध मोबाईल क्रमांकावरुन अश्लिल संभाषण करणा-या मोबाईलधारकांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला डॉक्टर एरंडोल येथील रहिवासी असून या घटनेप्रकरणी तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एरंडोल येथील एका महिला डॉक्टरला 29 डिसेंबरपासून जवळपास तेरा अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन वेळोवेळी कॉल आले आहेत. या महिला डॉक्टरचा मोबाईल क्रमांक या मोबईलधारकांनी मिळवून अश्लिल संभाषण करुन मानसिक त्रास देण्याचा जणू सपाटाच लावला. अखेर या महिला डॉक्टरने सायबर पोलिस स्टेशन गाठत सायबर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे पुढील तपास करत आहेत.







