मैत्रीणीच्या वादातून तरुणावर चाकूने दुखापत

On: January 10, 2023 10:29 AM

जळगाव : मैत्रीणीसोबत बोलून आमच्यामधे भांडण लावले असा वाद घालून तरुणावर चाकूने दुखापत करणा-याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय अनंत भिरुड असे दुखापत झालेल्या शांती नगर भुसावळ येथील विद्यार्थ्याचे नाव आहे.

चैतन्य रुपेश पाटील रा. जुना सातारा भुसावळ या तरुणाने 8 जानेवारी 2023 रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास भुसावळ शहरातील शांतीनगर परिसरातील ज्ञानेश्वर गार्डन येथे जय भिरुड या विद्यार्थ्यास गाठले.

तु माझ्या मैत्रीणीसोबत बोलून आमच्यामधे भांडण लावले असा चैतन्य याने जय सोबत वाद घातला. धक्काबुक्की करत बघून घेण्याची धमकी देत चैतन्य याने जयच्या कमरेच्या डाव्या बाजूस चाकूने मारुन दुखापत केली. त्यानंतर तो मोटार सायकलने पळून गेला. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक अब्दुल रज्जाक खान करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment