हद्दपार आरोपीने ब्रोकरला मागीतली खंडणी

On: January 14, 2023 11:48 AM

जळगाव : चोपडा सह इतर  तालुक्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीकडून जमीन खरेदी विक्री करणा-या  ब्रोकरला दहा  हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चोपडा शहर  पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी (रा. बारीवाडा चोपडा जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.

गोवर्धन चैत्राम चौधरी हे चोपडा शहरात जमीन खरेदी विक्रीचे काम करतात. त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरु राहण्यासाठी वैभव गवळी याने त्यांना दहा हजार रुपयांची मागणी केली. त्याला नकार दिला असता त्याने गोवर्धन चौधरी यांना लाकडी काठीने हाता पायावर मारहाण करुन हात फ्रॅक्चर केला. हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या लक्ष्मण बारी यांना जीवे ठार करण्याची धमकी देण्यात आली. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे करत आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment