तलवारीसह रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक

On: January 15, 2023 6:12 PM

जळगाव : तलवार बाळगत फिरणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास तलवारीसह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रितेश उर्फ कृष्णा शिंदे रा. रामेश्वर कॉलनी असे त्याचे नाव आहे.

रितेश शिंदे हा तलवारीसह इच्छादेवी मंदीर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सुधीर साळवे, योगेश बारी, सतिष गर्जे, साईनाथ मुंडे आदींना त्याला ताब्यात घेण्याकामी रवाना केले होते.

रितेश शिंदे याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला  असून त्याच्या विरुद्ध यापुर्वी 18 गुन्हे दाखल आहेत. न्या. पी. आर. वाघडोले यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment