नाशिक : एकाच महिलेवर दोघांच्या प्रेमातून झालेली खूनाची घटना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. 12 जानेवारी रोजी झालेल्या खूनाच्या या घटनेप्रकरणी ओझर पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध गु.र.न. 4/23 भा.द.वि. 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रमोद दत्तु निकाळजे या 32 वर्ष वयाच्या तरुणाची ओझर परिसरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली होती.

जयेश देवराम भंडारे आणि मयत प्रमोद दत्तु निकाळजे या दोघांचे एकाच महिलेवर प्रेम होते. त्यातून जयेश भंडारे याने त्याचा साथीदार रावसाहेब उर्फ संदिप मधुकर बनसोडे (दोघे रा. आंबेडकर नगर ओझर) याच्या मदतीने प्रमोद निकाळजे याची तलवार आणि चॉपरने हल्ला करुन हत्या केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील, ओझर पोलिस स्टेशनचे पो.नि. अशोक रहाटे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणला. पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकाला पंधरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पुढील तपास ओझर  पोलिस स्टेशनचे पो.नि. अशोक रहाटे व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here