खुनाच्या गुन्ह्यातील दोघा फरार आरोपींना अटक 

On: January 21, 2023 6:48 PM

जळगाव : पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यातील दोघा फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. रोशन ओंकार सांळुके (रा. शाहू कॉलनी पाचोरा) आणि तेजस प्रदिप पाटील (रा.जयराम कॉलनी पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गु.र.न. 42/22 भा.द.वि. 302,143, 147, 148 आणि 149 नुसार गुन्हा दाखल आहे.

रोशन सांळुके व तेजस पाटील हे दोघे गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. दोघेही वावडदा ता. जळगाव येथे आल्याची गोपनीय माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजल्यानुसार त्यांच्या पथकातील सहका-यांनी दोघांना वावडदा – पाचोरा रस्त्यावरील पुलाजवळून ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश चौबे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, पोना विजय पाटील, प्रितम पाटील, सचिन महाजन आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment