सुरा बाळगणा-या हद्दपार आरोपीस अटक

On: January 26, 2023 10:16 PM

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरील हद्दपार आरोपीस घातक शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहीदस चव्हाण (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

दिनकर चव्हाण हा रामदेवबाबा मंदीर, सुप्रीम कॉलनी, जळगाव येथे हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवत असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळकसर, सचिन पाटील, पो. कॉ. चंद्रकांत पाटील आदींनी त्यास सु-यासह शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडील सुरा जप्त करण्यात आला आहे.

दिनकर चव्हाण याच्यावर मालमत्तेसह शरीराविरुध्दचे एकुण 19 गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असतांना तो मिळून आला. दि. 24 जानेवारी 2023 ते 7 फेब्रुवारी 2023 दरम्यान  शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठ्या किंवा शारीरीक दुखापती करण्यासाठी वापरात येतील असे कोणतेही हत्यार अथवा वस्तु घेवुन फिरण्यास मनाई असतांना देखील तो शस्त्रासह मिळून आला. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. वंजारी, पो.ना. हेमंत कळकसर, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment