लग्नसोहळ्यात स्टेजवरुन साडेतीन लाखाचा ऐवज चोरीला

On: January 28, 2023 11:12 AM

जळगाव : लग्नसोहळ्यात आलेल्या दाम्पत्याचा 3 लाख 54 हजार 500 रुपये किमतीचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅरेडाईज या लॉनवर 26 जानेवारी रोजी रात्री विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याला मनोज विक्रम कोळी हे सपत्नीक हजर होते. लॉनवरील स्टेजवर दोघे पती पत्नी हजर असतांना त्यांच्या ताब्यातील दिड लाख रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, 1 लाख 20 हजार रुपये रोख, 84 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच पाचशे रुपये किमतीची पर्स असा एकुण 3 लाख 54 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक किरण पाठक करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment