औरंगाबादला गुन्हा करुन आलेल्या दोघांना जळगावला अटक

On: January 29, 2023 4:57 PM

जळगाव : एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशन हददीत गुन्हा करुन फरार झालेल्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अजय लिलाधर गोसावी (रा. प्रजापत नगर जळगाव) आणि त्याचा साथीदार मनोज उर्फ मयुर शालीक चौधरी (रा.तुकारामवाडी जळगांव) अशी दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनला 17 ऑक्टोबर 2022 रोजी गु.र.न. 379/22  भा.द.वि. 328, 188, 273, 34 सह कलम 59 अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील दोघे संशयीत आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. ते दोघे जळगाव शहरातील प्रजापत नगर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश चोबे, पोहेकॉ  विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, पोना विजय पाटील, परेश महाजन आदींच्या पथकाला तपास तथा कारवाईकामी रवाना केले. या पथकाने दोघांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली. दोघांना औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment