बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपीस अटक

On: January 31, 2023 8:01 PM

जळगाव : बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सागर भिमा वैद्य (वय 22) (रा.टोणगाव ता.भडगाव जि.जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला पो.स्टे. गुरनं ९८/२०२३ भादवि कलम ३७६, ३७६ (२), (n), ३५४(c) माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ई), ६७ अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे.

गुन्हा घडल्यापासून तसेच दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. त्याचा शोध सुरु होता. तो टोणगाव ता. भडगाव येथे आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख आदींना तपासकामी तसेच त्याला अटक करण्याकामी रवाना केले होते. पथकाने भडगाव तालुक्यातील टोणगाव येथे जावून खात्री करुन त्याला अटक केली. पुढील तपासकामी त्याला भडगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment