तिस हजाराच्या चोरीप्रकरणी हॉटेलच्या वेटरविरुद्ध गुन्हा

On: February 3, 2023 11:03 AM

जळगाव : हॉटेलच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून काऊंटरमधे ठेवलेले तिस हजार रुपये चोरी झाल्याप्रकरणी हॉटेलच्या संशयीत वेटरविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयसिंग शेरसिंग ठाकुर (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत वेटरचे नाव असून त्याच्यावर गुन्ह्याचा आरोप करण्यात आला आहे.

धरणगाव शहरातील गणेश नगर परिसरात किशोर गणेश चौधरी यांच्या मालकीचे हॉटेल चंदन पॅलेस नावाचे परमीट रुम बिअर बार आहे. 28 ते 30 जानेवारी या कालावधीत त्यांच्या हॉटेलच्या खिडकीचे ग्रिल अज्ञात इसमाने तोडून आत प्रवेश केला. हॉटेलच्या काऊंटरमधील तिस हजार रुपये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी हॉटेलचा वेटर विजयसिंग ठाकुर याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. त्याचा मोबाईल देखील बंद येत होता. त्यामुळे संशयाच्या बळावर त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. राजेंद्र कोळी पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment