दुकानदाराच्या घरातून 50 हजाराची रोकड चोरी

On: February 3, 2023 7:29 PM

जळगाव : तांबापुरा परिसरातील दुकानदाराच्या घरातून पन्नास हजाराची रोकड चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिन शब्बीर पटेल हे तांबापुरा परिसरातील शहिद अब्दुल हमीद चौकात वास्तव्याला असून त्यांचे बी.जे.मार्केट येथे चारचाकी व दुचाकी वाहनांच्या मिटर विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुमजली घरात 1 व 2 फेब्रुवारी दरम्यान रात्रीच्या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडला.

1 फेब्रुवारीच्या रात्री सादिन पटेल हे खालच्या मजल्यावरील घराला कुलुप लावून वरच्या मजल्यावर परिवारासह झोपण्यासाठी गेले होते. दुस-या  दिवशी सकाळी सहा वाजता घराचा कडीकोंडा तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. घरातील वस्तूंची पाहणी केली असता किचनमधील डब्यासह पर्समधील एकुण पन्नास हजाराची रक्कम चोरी झाल्याचे आढळून आले. या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment