महिलेची हत्या करणा-याचा शोध जारी

On: February 8, 2023 6:45 PM
crimeduniya

जळगाव : जामनेर तालुक्यातील चिंचपुरा येथील महिलेच्या खूनाचा तपास सुरु असून धागेदोरे संकलीत करण्याचे कामकाज प्रगतीपथावर सुरु असल्याचे म्हटले जात आहे. चिंचपुरा येथील महिलेची 6 फेब्रुवारी 2023 रोजी ती रहात असलेल्या गावातच अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने डोक्यात मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरलाबाई सुरेश पाटील (वय 44) 44) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

सरलाबाई सुरेश पाटील या महिलेची हत्या झाल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी चाळीसगाव उप विभागीय अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, जामनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे, स.पो.नि. दिलीप राठोड आदींनी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. दिलीप राठोड करत आहेत. महिलेची हत्या कुणी व का केली असेल असा प्रश्न जामनेर परिसरात उपस्थित केला जात असून या घटनेने खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment