बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

On: February 9, 2023 7:48 AM

जळगाव : बलात्काराचा गुन्हा केल्यापासून तसेच गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेल्या संशयीत आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव येथून अटक केली आहे. विजय पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गु.र.न.19/23 भा.द.वि. 376(1), 354(ड), 506, 507, सह पोस्को अधिनियम 2012 चे कलम 3 (अ), 4, 11 (1), 12 नुसार गुन्हा दाखल आहे.

फरार संशयीत आरोपी विजय पाटील हा भडगाव शहरातील बस स्थानक परिसरात आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, रणजीत जाधव आदींच्या पथकाने या कारवाईकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment