उपचारादरम्यान जिम ट्रेनरचा मृत्यू – खुनाचे कलम वाढणार

On: February 9, 2023 11:45 AM

जळगाव : दोन दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या भुसावळ येथील जिम ट्रेनरचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने भुसावळ शहरात खळबळ माजली आहे.

जिम ट्रेनर अफाफ पटेल याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अठरा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाची या हल्याला किनार असल्याचे म्हटले जात आहे. अफाफ पटेल याच्या मृत्यूमुळे खुनाचे कलम वाढणार आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि मंगेश गोंटला करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment