अश्लिल व्हिडीओच्या बळावर स्विकारली ऑनलाईन रक्कम

On: February 10, 2023 12:23 PM

जळगाव : अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करुन ते पैसे ऑनलाईन स्विकारल्याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपा, आयपीएस प्रेमप्रकाश आणी मनजितसिंग अशी पलीकडून फोनवर धमकी देत पैसे उकळणा-या तिघांची कथित नावे आहेत.

जळगाव शहरातील गिरणा पंपीग परिसरातील राहणा-या एका नोकरदार व्यक्तीला त्याच्या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर पलीकडून अनोळखी क्रमांकावरुन व्हीडीओ कॉल आला. आलेल्या अश्लिल व्हिडीओ कॉलमुळे या नोकरदार व्यक्तीच्या भावना कामोत्तेजक झाल्या. दरम्यान इकडून बोलणा-याचा नग्न व्हिडीओ व्हायरल झाला असल्याचे नंतर त्याला सांगण्यात आले. हा व्हिडीओ डीलीट करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. व्हिडीओ डीलीट न केल्यास पलीकडून आयपीएस बोलत असल्याची बतावणी करुन कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली. एकंदरीत दोघा तिघांनी मिळून भयाचा सापळा रचून आणि फेकून या नोकरदाराला घाबरवून सोडण्यात आले.

घाबरलेल्या या नोकरदाराने 5 लाख 81 हजार 80 रुपये बदमाशांनी दिलेल्या विविध बॅंकाच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग केले. त्यानंतर देखील त्यांचा मोह सुटला नाही. त्यांनी पैशांची मागणी सुरुच ठेवली. व्हाटसअ‍ॅप मेसेज आणि बनावट नावे सांगून पैशांची मागणीसह धमकी देणा-या तिघांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment