शेतक-यांची लुट करणा-या फरार आरोपीस अटक

On: February 12, 2023 9:11 PM

जळगाव : शेतक-यांची लुट करुन गेल्या दोन वर्षापासून फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. शाहरुख रज्जाक तडवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भडगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 104/2021 भा.द.वि. 379,34 नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात शाहरुख तडवी याचे नाव निष्पन्न झाले आहे. गुन्हा घडल्यापासून तसेच दाखल झाल्यापासून तो फरार होता.

पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील रहिवासी असलेला शाहरुख तडवी हा अटक चुकवत फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्याचा समांतर तपास सुरु होता. फरार शाहरुख तडवी हा पिंंपळगाव हरेश्वर येथे आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला तेथून अटक करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना रणजित अशोक जाधव, पोना किशोर ममराज राठोड, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपासकामी शाहरुख तडवी यास भडगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment