नगरसेविकेला फोनवर अश्लिल शिवीगाळ

On: February 13, 2023 1:22 PM

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या एका नगरसेविकेला तिच्या मोबाईला फोनवर अनोळखी इसमाने अश्लिल शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

जळ्गाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या एका 50+ वयाच्या नगरसेविकेच्या मोबाईलवर 11 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास एका अनोळखी मोबाईलधारकाचा कॉल आला. यावेळी फोनवर पलीकडून बोलणा-या मोबाईलधारकाने त्या महिला नगरसेविकेला अश्लिल शिवीगाळ करत तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वक्तव्य केले. याशिवाय जीवे ठार करण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. ओमप्रकाश सोनी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment