फिल्मसिटी महिला आर्टीस्टला लग्नाचे आमिष दाखवत फसवणूक

On: February 13, 2023 2:16 PM

जळगाव : फिल्मसिटीत काम करणा-या महिला आर्टीस्टसोबत शरीरसंबंध निर्माण केल्याच्या आरोपासह तिला लग्नाचे आमिष दाखवल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करण्यासह लग्नास नकार दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील 29 वर्षाची फिर्यादी तरुणी फिल्मसिटीत महिला आर्टीस्ट असून तिच्यासोबत पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील तरुणाने शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. फेब्रुवारी 2021 मधे हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. सदर फिल्म आर्टिस्ट तरुणी नगरदेवळा येथे तरुणाला जाब विचारण्यासाठी गेली असता तरुणाच्या आईने तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. तु आमच्या घरची सुन होण्यास लायक नाही, पुन्हा येथे आली तर तुझे हातपाय तोडून ठेवेल अशी तिला धमकी देण्यात आल्याचे आर्टीस्ट तरुणीने आरोप केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख करत  आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment