रत्नागिरीत गणेश विसर्जनाच्या वेळी दोघे बुडाले

On: August 23, 2020 10:24 PM

रत्नागिरी : दीड दिवसांचा गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोघे काजळी नदीच्या खाडीत बुडाल्याची घटना आज सायंकाळी घडली. सत्यवान उर्फ बाबय शरद पिलणकर (४५) आणि विशाल सुनील पिलणकर (२७) अशी त्यांची नावे आहेत. उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही.

गणेश विसर्जन करतांना दोघे पाण्यात उतरले होते. त्यावेळी अचानक पाण्याची लाट आली व त्यात दोघे वाहून गेल्याने बुडू लागले. हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. मात्र त्यात कुणालाही यश आले नाही. दोघे जण पाण्यात बेपत्ता झाले. त्यांचा तपास लागू शकला नाही.गणेश विसर्जनासाठी काही नियम घालण्यत आले आहेत. तरी देखील भाविक उत्साहाच्या भरात पाण्यात उतरतात. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. मात्र बुडालेल्या दोघांचा तपास अद्याप लागू शकला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment