चारचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांक मालिका

On: August 25, 2020 9:27 PM

जळगाव : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील चारचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच 19- सीझेड-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 27 व 28 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावेत.

या अर्जासोबत शासकीय शुल्काचा डीडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा. शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही. नवीन मालिका दि. 2 सप्टेंबर, 2020 पासून नियमित सुरु करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment