आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणीचे रविवारी आयोजन

On: August 30, 2024 6:45 PM

जळगाव दि .३० प्रतिनिधी –  आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी  निवड चाचणीचे आयोजन आता रविवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०८ . ३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर  ( विद्या इंग्लिश शाळेच्या मागे )  आयोजित करण्यात आली आहे.

ज्या मुलांचा जन्म दिनांक ०१.०९.२०१० रोजी वा त्या नंतरचा असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग खाली दिलेल्या लिंकवर  https://forms.gle/rnd5WxDmLUgmdmi27 जाऊन गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी ₹ १००/- भरून आपला सहभाग नोंदवावा व सोबत आपले आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा तसेच निवड चाचणी साठी क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज ओरिजनल जन्म दाखला / आधार कार्ड सोबत आणावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन  यांनी केली आहे अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे ( ९४०४९५५२०५ ) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) यांचेशी संपर्क साधावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment