जळगावचे विष्णु भंगाळे यांची सेना (उबाठा) गटातून हकालपट्टी

On: November 19, 2024 5:02 PM

जळगाव : शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे जळगाव जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेच्या (उबाठा) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. नेते सचिव शिवसेना (उबाठा) विनायक राऊत यांच्या सहीचे पत्र प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आले आहे.

विष्णु भंगाळे लवकरच शिवसेना (शिंदे गट) जाणार असल्याची चर्चा जळगाव शहरासह जिल्ह्यात सुरु होती. विष्णु भंगाळे शिंदे सेनेत जाणार असल्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना यामुळे फायदा होणार असून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांना या निर्णयामुळे फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment