रेल्वे रुळावर झोपून वृद्धाचीआत्महत्या

जळगाव : रेल्वे रुळावर झोपून अनोळखी वृद्धाने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली असून वारसाचा शोध लागण्याकामी मृताची ओळख  पटवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दि. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शिरसोली ते जळगाव दरम्यान डाऊन रेल्वे ट्रॅकवर झोपून कुणीतरी अज्ञात वृद्धाने आत्महत्या केल्याची माहिती लोको पायलटने  उप स्टेशन प्रबंधक जळगाव यांना त्यांच्या व्हिएचएफ सेटवर कळवली. त्या माहितीच्या आधारे उप स्टेशन प्रबंधक एम. एल. रोडगे यांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.

आत्महत्या करणा-या इसमाचे अंदाजे वय 60 ते 65 वर्ष असून उंची अंदाजे साडेपाच फुट आहे. तसेच अंगात पांढ-या रंगाचा शर्ट, पांढ-या रंगाची बंडी व त्याच रंगाचे धोतर व अंतर्वस्त्र परिधान केले आहे. मयताची ओळख  पटवण्यासाठी मयताच्या वारसांचा शोध लागणे गरजेचे असून त्याकामी ओळख पटवण्याचे जळगाव तालुका पोलिस स्टेशनमार्फत आवाहन करण्यात आले आहे. कुणाला काही माहिती असल्यास जळगाव तालुका पोलिस स्टेशनला 0257 2253002 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here