नवी दिल्ली : कोरोनामुळे कमकुवत झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार सरकारी उपक्रमांत आपली भागीदारी विक्रीच्या योजनेवर काम करत आहे.
केंद्र सरकारने २३ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरणाचे ठरवले आहे. त्याला मंत्रिमंडळाकडून संमती मिळाली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खासगीकरण करण्यात येणाऱ्या २३ सरकारी कंपन्यांबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र सरकार आपली भागीदारी २३ नव्हे तर २६ सार्वजनिक कंपन्यांमधील विक्री करणार असल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे.
सर्व २६ कंपन्यांच्या नावांसह विक्री झालेल्या भागीदारीची टक्केवारी बाजारपेठेनुसार ठरवण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे. भागीदारी विक्री करण्यात येणा-या कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे उघड झाले आहे.
Project & Development India Limited (PDIL), Engineering Projects India Limited (EPIL), Pawan Hans Limited (PHL), B&R Company Limited (B&R), Air India, Central Electronics Limited(CEL), Cement Corporation India Limited CCIL (Nayagaon unit), Indian Medicine & Pharmaceuticals Corporation Ltd. (IMPCL), Salem Steel Plant, Bhadrawati Steel Plant, Durgapur Steel plant, Ferro Scrap Nigam Ltd. (FSNL), Nagarnar Steel Plant of NDMC, Bharat Earth Movers Limited (BEML), HLL Lifecare, Bharat Petroleum Corporation Ltd. (BPCL), Shipping Corporation of India Ltd. (SCI), Container Corporation of India Ltd (CONCOR), Nilachal Ispat Nigam Limited (NINL), Hindustan Prefab Limited (HPL), Bharat Pumps and Compressors Ltd (BCPL), Scooters India Ltd (SIL), Hindustan Newsprint Ltd (HNL), Karnataka Antibiotics & Pharmaceuticals Ltd (KAPL), Bengal Chemicals and Pharmaceuticals Ltd. (BCPL), Hindustan Antibiotics Ltd. (HAL), Indian Tourism Development Corporation (ITDC), Hindustan Fluorocarbon Ltd (HFL)