अरुण गवळीस अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सक्तमजुरी

On: January 18, 2025 8:34 AM

जळगाव : चौदा वर्षाच्या नवव्या वर्गात शिकणा-या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अरुण भगवान गवळी (रा. गुम्मी, जि. बुलढाणा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. न्या. एस. आर. भांगडिया – झवर यांच्या न्यायालयाने त्याला दहा वर्ष सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.

शिरपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी पाचोरा तालुक्यात तिच्या आजोबांकडे शिक्षणासाठी रहात असतांना हा प्रकार घडला होता. इयत्ता नववीमध्ये असताना 24 डिसेंबर 2016 रोजी शाळा सुटल्यानंतर देखील ती घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या आजोबांनी पाचोरा पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. दरम्यानच्या कालावधीत आरोपी अरुण गवळी याने तिला तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत रेल्वे स्टेशनला बोलावून घेत त्याच्या बहिणीकडे नेले होते. रात्रभर बहिणीकडे मुक्कामी राहिल्यानंतर त्याने पिडीतेला छत्रपती संभाजीनगर येथे नेले होते.

तिच्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याने ती सहा आठवड्यांची गर्भवती झाली. ती गर्भवती झाली असल्याचे त्याने तिच्या आईला कळवले. आपल्याला मारहाण होईल या भीतीने अरुण गवळी नजीकच्या बेगमपुरा पोलिस स्टेशनला हजर झाला. तेथून गवळी यास ताब्यात घेण्यात आले.

डॉ. प्रवीण ठाकरे यांच्यासह पीडितेची मैत्रीण, पीडितेची मामी यांच्या साक्ष न्यायालयात महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षी, पुरावे आणि चौकशीअंती न्या. एस. आर. भांगडिया – झवर यांनी अरुण गवळी यास भादंवि कलम 376 नुसार दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व विस हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, भादंवि कलम 363 नुसार दोन वर्षे सक्त मजुरी, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आठ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment