भावजयीची हत्या करणा-या दिरास जन्मठेप

On: August 12, 2026 12:58 PM

जळगाव : विम्याची रक्कम आणि प्लॉटच्या वादातून भावजयीची हत्या करणा-या दिरास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा न्यायधिश – 2 श्रीमती ए. एस. खडसे यांनी हा निकाल सुनावला आहे. जळगाव शहराच्या पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीत 21 मे 2021 रोजी ही घटना घडली होती. दिपक लोटन सोनार असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास जन्मठेपेसह दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. मयत योगीता मुकेश सोनार हिचा खून होत असतांना तिचा मुलगा व या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आर्य सोनार याची साक्ष या शिक्षेप्रकरणी महत्वाचा दुवा ठरली. आर्य सोनार या बालकासमोर त्याच्या काकाने हा खून केला होता.

Anil Badgujar (investigation officer)

हत्या झालेल्या योगिता सोनार यांच्या पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर मिळालेल्या विम्याच्या रकमेसह घराच्या प्लॉटवरून आरोपी दीपक हा घरात वाद घालत असे. घटनेच्या दिवशी 21 मे 2021 रोजी रात्री सव्वा नऊ वाजता दिपक सोनार याने योगिता सोनार यांच्या डोक्यात कु-हाडीचे वार करत त्यांची हत्या केली होती.

योगिता सोनार यांच्या डोक्यात कु-हाडीचे वार होत असतांना आर्य सोनार याने ती कु-हाड खेचून लांब फेकली होती. त्यानंतर आरोपीने “सर्व संपले” असे म्हणत घटनास्थळावरुन पलायन केले होते. या खटल्यात एकुण सतरा साक्षीदारांची तपासणी झाली. सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी हिरालाल पाटील, व केस वॉच पोलिस कर्मचारी इकबाल पिंजारी, हवालदार जितेंद्र तावडे व अतुल चौधरी यांनी या खटल्याकामी मदत केली. तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी या खून प्रकरणाचा तपास केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment