सोने -चांदी पुन्हा झाले स्वस्त

सोमवारी सोने चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली. मात्र मंगळवारी त्यात पुन्हा एकवेळ घसरण झाली. एमसीएक्सवर सकाळी 10 वाजता ऑक्टोबरच्या सोन्याच्या वायदा भावात 203 रुपयांनी घसरण होवून ते 50862 रुपयांवर आले होते. गेल्य सत्रात सोने 51065 रुपयांवर बंद झाले होते. आज सकाळी 50800 रुपयांवर खुले झाले. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात सोन्याचे भाव 124 रुपयांनी घसरत 51120 रुपयांवर आले होते. गेल्या सत्रात ते 51244 रुपयांवर बंद झाले होते. आज सकाळी 51023 रुपयांवर उघडले. डिसेंबरच्या डिलीव्हरीसाठी चांदी 382 रुपयांनी कमी होवून ती 67889 रुपये प्रति किलोवर बंद झाली. गेल्या सत्रात चांदी 68271 रुपयांवर बंद झाली. आज सकाळी चांदी 67799 रुपयांवर खुली झाली.

दिल्ली सराफा बाजारात रुपयाच्या घसरणीमुळे सोमवारी सोन्याचा भाव 258 रुपयांनी वाढत गेला आणि 51,877 रुपयांवर आला. गेल्या सत्रात सोन्याचा भाव 10 ग्रॅम 51,619 रुपयांवर बंद झाला. चांदीदेखील 837 रुपयांनी वाढत 69,448 रुपये प्रतिकिलो झाली. ती यापूर्वी 68,611 रुपये प्रतिकिलो होती. सोमवारी अमेरिकी डॉलरच्यातुलनेत रुपया 21 पैशांनी घसरला आणि 73.35च्या पातळीवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने – चांदी अनुक्रमे 1,932 डॉलर प्रति औंस व 26.93 डॉलर प्रति औंसवर बंद झाले. मागील महिन्यात 7 ऑगस्टला सोन्याने फ्युचर्स मार्केटमधील उच्चांकाची लेव्हल गाठली. ती दर दहा ग्रॅमची किंमत वाढून 56,200 रुपये झाली. त्यानंतर महिन्याभरात सोन्याची किंमत सुमारे 5500 रुपयांनी कमी झाली. याचाच अर्थ एका महिन्यात सोन्याची किंमत दहा टक्क्यांनी कमी झाली. सोन्याच्या किमतीत एवढी घसरण सोन्याची खरेदी करण्यास एक चांगली संधी म्हटली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here