प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर पथनाट्याद्वारे जनजागृती !

On: June 10, 2025 8:05 PM

जळगाव/अमळनेर दि.१० प्रतिनिधी – महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण सप्ताह दि.५ ते ११ जून दरम्यान आयोजित केलेला आहे. पर्यावरणासह हवामानातील बदलांविषयी जिल्ह्यात जनजागृती विशेष कार्यक्रमांद्वारे केली जाईल. त्यानिमित्त यावर्षाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ आहे याच विषयावर अमळनेर नगरपरिषदेसह, मंगळग्रह संस्थान आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त मंगळग्रह मंदिरात उज्वल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या सहाय्याने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झालेत. मंदिरातील भक्तांना कापडी पिशवी वाटप करण्यात आले. त्यात प्लास्टिक वापरामुळे होत असलेले दुष्परिणाम यावर प्रबोधन करण्यात आले. कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर कसा होईल याचे महत्त्व सांगण्यात आले. त्यानंतर नाटिका सादर करून जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचा अंत यावर भाष्य करण्यात आले. उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. यावेळी माजी आमदार कृषिभुषण साहेबराव पाटील, जयश्री पाटील, प्रांतधिकारी श्री. मुंडावरे, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक श्री. निकम, अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, सहस्वच्छता निरीक्षक संतोष बिर्‍हाडे,सामाजिक कार्यकर्ता शरद सोनवणे, यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, मदन लाठी, विक्रम अस्वार उपस्थित होते. अमळनेर मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष डिगंंबर महाले, उपाध्यक्ष एस. एम. पाटील, सहसचिव दिलीप बहीराम, विश्वस्त अनिल अहिराव यांच्यासह स्वयंसेवक उपस्थीत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे जिल्हा अधिकारी करणसिंग राजपूत, उपअधिकारी राजेन्द्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

उज्ज्वल इंग्लिश मिडीअम शाळेतर्फे स्वप्नील बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याूतन आजच्या प्लास्टीक वापरामुळे होत असलेले पर्यावरणाचे नुकसान ते वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे प्रबोधन झाले. 

यावेळी अमळनेर मंगळग्रह मंदिराचे जयश्री सादे, प्रकाश मेरवा, सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नरेंद्र सिंग, तुंबा गिरासे, उज्वला शहा, वसुंधरा लांडगे, पीआरओ रविंद्र मोरे, प्रसाद महाराज, वैद्य गुरूजी, शैलेश गुरुजी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment