अवसायनातील संस्थांच्या कारवाईबाबत दावे सादर करण्याचे आवाहन

On: July 9, 2025 7:46 PM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील काही सहकारी संस्था अवसायनात आहेत. त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सहकार विभागाकडून करण्यात येत आहे. या संस्थांविरुद्ध कुणाचे काही दावे असल्यास त्यांनी दोन महिन्याच्या आत ते दावे सादर करण्याचे आवाहन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था घाटंजी यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यानंतर तो दावा लागु होणार नाही.

अतिश गृह तारण सहकारी संस्था घाटंजी, आबासाहेब पारवेकर गृहनिर्माण सहकारी संस्था, पारवा ता. घाटंजी, खोब्रागडे मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था घाटंजी, अभिनव एकलव्य जैव इंधन उत्पादक सहकारी संस्था, कुर्ली ता. घाटंजी, प्रगती महिला नागरी सहकारी पत संस्था घाटंजी, श्रीकृष्ण कृषी प्रक्रिया औद्योगीक सहकारी संस्था घाटंजी, सुयोग सहकारी भाडेकरु व मालकी गृहनिर्माण संस्था घाटंजी, गौरव गृहतारण सहकारी संस्था घाटंजी या सहकारी संस्थाची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याचे घाटंजीचे सहाय्यक निबंधक कैलास खटारे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment