खासगी जागेवर अतिक्रमण प्रकरणी सुनावणी

On: July 25, 2025 4:50 PM

यवतमाळ : बनावट कागदपत्रे सादर करुन शासकीय घरकुलांचा लाभ घेत संमती नसतांना खासगी जागेवर बांधकाम करुन शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली संबंधीतांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, त्यांना निलंबीत करावे अशी मागणी कुर्ली ग्रामपंचायत सदस्या मिराबाई हनमंतू किणाके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे. याप्रकरणी कुर्ली ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व सचिव यांची यवतमाळ जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कक्षात सुनावणी झाली.

ग्रामपंचायत सदस्या मिराबाई किणाके यांचे हे प्रकरण यवतमाळ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल असून प्रलंबित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे. या वेळी तक्रारदार ग्रामपंचायत सदस्या मिराबाई हनमंतू किणाके, कुर्लीचे सरपंच सतिश लचमारेड्डी गड्डमवार, ग्रामपंचायत सदस्य ज्योत्स्ना आकाश आत्राम व ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) राजू भाऊराव जामुनकर व त्यांचे वकील या वेळी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment