एसबीआय घाटंजी शाखेतर्फे महिला मेळावा उत्साहात

On: July 27, 2025 1:39 PM

यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील महिलांपर्यंत शासकीय योजना आणि बँकिंग सेवा पोहोचाव्यात, यासाठी भारतीय स्टेट बँक शाखा घाटंजीच्या वतीने विशेष महिला मेळावा नुकताच बाळकृष्ण मंगलम येथे उत्साहात झाला.

या कार्यक्रमात महिलांना विविध वित्तीय योजनांची माहिती देण्यात आली. मुद्रा लोन, मुख्यमंत्री उद्यमी योजना, महिला समृद्धी योजना, तसेच प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम यांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक राकेश कुमार यादव यांनी भुषवले. उपमहाव्यवस्थापक शशी रंजन, प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत इकडे, आणि शाखा व्यवस्थापक दिलजीत चोपडे हे या वेळी मंचावर उपस्थित होते. प्रशांत हिवराळे, सुबोध बिबेकर, विशाल ठाकरे आणि गोविंद खिची यांनीही सहभाग घेतला. महिलांना गृहउद्योग उभारणीसाठी तसेच वैयक्तिक गरजांसाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. नियमित कर्ज परतफेडीचे महत्त्वही विषद करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment