पाटणबोरी येथील मदरशात स्वातंत्र्य दिन उत्साहात

On: August 19, 2025 4:31 PM

यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील दारुल उलूम तालीमुल कुरआन मदरसा येथे हजरत उजे़फा एज्युकेशन ॲंड वेलेफेयर सोसायटी, पाटणबोरी तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी तालीमुल कुरआन मदरसाचे अध्यक्ष अल्लाबक्ष लुलाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी पाटणबोरी दारुल उलूम तालीमुल कुरआन मदरसाचे सचिव मौलाना शेख अय्युब इशाती, वारा कौठा येथील माजी सरपंच त्र्येंबक नगराळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय भागानगरकर आदींची समायोचित भाषणे झाली.


या वेळी पाटणबोरी दारुल उलूम तालीमुल कुरआन मदरसाचे विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात दारुल उलूम तालीमुल कुरआन मदरसाचे अध्यक्ष अल्लाबक्ष लूलानी, उपाध्यक्ष सरदार खान, सचिव मौलाना शेख अय्यूब इशाती, शेख शब्बीर, अब्दुल गफ्फार तंवर, हाजी अब्दुल रहीम, मौलाना अब्दुल सत्तार, शेख जावेद, जामा मस्जिद पाटणबोरीचे अध्यक्ष शेख हबीब, मोलाना सैय्यद आबिद, मोलाना शेख सलीम, शेख हुजैफा मोलाना सर, अब्दुल मुकीत मुफ्ती, सैय्यद फारूक मौलाना, सैय्यद अदनान मुफ्ती, दानिश मुफ्ती, तारिक अली, हाफिज मुफ्ती बिलाल, हाफिज सईद या सह सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय भागानगरकर, वारा कौठा ग्रामपंचायतचे माजी सरपंच त्र्येंबक नगराळे तसेच पाटणबोरी पुण्यनगरी चे वार्ताहर मोबीन तिघाले, पत्रकार इम्रान खिच्ची, पत्रकार संतोष मामीडवार, वारा कौठा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment