जळगाव : IT DigiTech Solutions द्वारे जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजातील खेळाडूंचा समावेश करून *जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025(JBCL सीजन 2)चे दि.16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी गोरजाबाई टर्फ येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले होते.सर्व संघामध्ये खेळाडू हे ग्रेडनिहाय समान निवड पध्दतीने देण्यात आल्याने सर्व संघ तुल्यबळ होते.
स्पर्धेत या वर्षीचा विजेता संघ-रे फाउंडेशन, उपविजेता संघ-ट्रिपगुरु टूरिझम, तृतीय क्रमांक-महाजन बेकर्स, चतुर्थ स्थान-स्पार्टन या संघाने पटकावले. सर्व विजेत्या संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. JBCL पर्व 2 च्या यशस्वीपणे आयोजनात सर्व स्पॉन्सर, JBCL आयोजन समितीचे अक्षय पाटील, गणेश पाटील,हितेश मराठे,माही जाधव, स्वप्नील पाटील, ऋषिकेश पाटील,कल्पेश बाविस्कर, राहुल कदम आणि मित्र परिवार यांनी मेहनत घेऊन काटेकोरपणे नियोजन करून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.








