बालकच झाले गुन्हेगार – बालकावर करतात चाकूचे वार

On: November 10, 2025 5:39 PM

जळगाव : अल्पवयीन मुलांच्या अंगी गुन्हेगारी वृत्ती पसरली असल्याचे बोदवड येथील एका घटनेतून दिसून आले आहे. बोदवड येथे एका बालकावर इतर बालकांनी रविवारी दुपारी चाकूचे वार केल्याची घटना घडली. या घटनेत एक बालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

बोदवड येथील मलकापूर रस्त्यावरील टेनिस कोर्टमध्ये काही मुले टेनिस खेळत होते. त्यावेळी टेनीस खेळणा-या बालकाला काही बालकांनी मारहाण सुरु केली. त्यातील काही बालकांच्या हाती चाकू होता. तो चाकू बघताच काही बालके भितीपोटी पळून गेली. मात्र पाचव्या इयत्तेत शिकणा-या अकरा वर्षाच्या एका बालकावर त्या मुलांनी चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला.

इतर बालकांनी जखमी बालकाच्या घरी या घटनेची माहिती दिली. बालक जखमी झाल्याचे बघून हल्लेखोर बालक पळून जाण्यात यशस्वी झाले. जखमी बालकावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बोदवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment