जळगाव – चित्रपट सृष्टीतील ही मॅन अर्थात धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल जळगाव नगरीचे उद्योगपती अशोक भाऊ जैन यांनी शोक व्यक्त केला आहे. चित्रपट सृष्टीतील देखणा व तडफदार कलाकार अशी ओळख धर्मेंद्र देओल यांनी तयार केली होती असे त्यांनी म्हटले आहे.
धर्मेंद्र यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांवर आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. त्यांनी आपल्या अभिनयातून अनेकांना मनमुराद आनंद दिला. धर्मेंद्र यांची शोले चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना भारावून टाकणारी होती. शोले सारखा चित्रपट आजही भावतो. अशी निर्मिती क्वचितच होते. असा चित्रपट होणे नाही. त्यांनी एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून ही चांगले काम केले होते. त्यांच्या निधनाने आपण एक उत्तम कलाकार गमावला असून याची उणीव नक्कीच भासेल असे जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी म्हटले आहे.








