चोरीची बैल जोडी हस्तगत – चौघे अटकेत 

On: October 23, 2026 6:46 PM

जळगाव – चोरीला गेलेली बैलजोडी पहुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने हस्तगत केली असून चौघा जणांना जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईत दोन बैल व चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण २,८५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पिंपळगाव गोलाईत शिवारातून मावळी जातीचे पांढऱ्या रंगाचे अंदाजे ७ ते ८ वर्ष वयाचे दोन बैल चोरी झाले होते. याप्रकरणी पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पहुर पोलिसांनी हस्तगत केलेली बैलजोडी मुळ मालकाच्या ताब्यात दिली आहे. चोरीची बैल जोडी खरेदी करणाऱ्या विरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोहेकॉ दीपक पाटील, पोकॉ ईश्वर कोकणे, पोकॉ सत्यवान कोळी, वैभव देशमुख, चालक पोहेकॉ हेमंत सोनवणे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला अधिक तपास पोलीस हवालदार दीपक पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment