महसुल मंत्री बावनकुळे यांच्या वापरातील वाहनावर 57 हजारांचा थकीत दंड?

On: October 9, 2026 3:44 PM

राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वापरत असलेल्या टोयाटा फॉर्चुनर (एमएच 40 सीएक्स 6464) या वाहनावर आतापर्यंत 57 हजार 500 रुपयांच्या इ चलनचा दंड थकीत असल्याचे मिळालेल्या माहितीतून उघडकीस आले आहे. जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना याबाबत माहिती मिळाली आहे. नियम केवळ सर्वसामान्य लोकांनाच सक्तीने लावला जातो आणि व्हिआयपींना यातून सुट दिली जाते का? असा भाबडा प्रश्न या निमीत्ताने जनतेत विचारला जात आहे.

राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वापरत असलेले टोयाटा फॉर्चुनर (एमएच 40 सीएक्स 6464) हे वाहन त्यांच्या नावावर नसले तरी ते त्यांच्या ताब्यात असून त्याचा ते वापर करत आहेत. या वाहनावर त्यांनी आमदाराचे स्टिकर लावले असुन या वाहनावर लाल अक्षरात एम हे अक्षर लिहिले आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या ताब्यात हे वाहन होते. या वाहनावर सर्वात पहिले चलन 11 डिसेंबर 2024 रोजी टॉवर सीएसटी या ठिकाणी दोन हजार रुपयाचे पडले होते. शेवटचे चलन 29 सप्टेंबर 2026 रोजी सी लिंक मुंबई येथे देखील दोन हजार रुपयांचे  पडले आहे. आतापर्यंत या वाहनावर एकुण 30 इ चलन पडले असून त्या चलनांची एकुण रक्कम 57 हजार 500 रुपये एवढी झाली आहे.  

दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जळगाव दौऱ्यामध्ये आले होते. त्यांच्या ताफ्यामध्ये व ते वापरत असलेल्या वाहनावर शासनाचा एवढा मोठा दंड थकीत असून आतापर्यंत एकही दंड भरण्यात आलेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड थकीत असतांना या वाहनाविरुद्ध अद्याप कारवाई का झाली नाही असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment