दीपककुमार गुप्ता यांचे एक दिवसीय उपोषण

On: December 7, 2020 2:54 PM

जळगाव : जळगाव शहरात विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुले बांधण्यात आली आहे. मात्र या व्यापारी संकुलात येणा-या ग्राहकांना त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहने लावण्यासाठी अधिकृत जागेची व्यवस्था जळगाव महानगरपालिकेने केलेली नाही. पर्यायाने वाहनधारकांना आपल्या ताब्यातील वाहने थेट रस्त्यावर लावण्याची वेळ येते. त्यामुळे शहर पोलिस वाहतुक शाखेकडून वाहनधारकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाते.

पार्कींगप्रश्नी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी आज एकदिवसीय उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. हे उपोषण त्यांनी थेट म.न.पा. आयुक्त सतीष कुलकर्णी यांच्या दालनात सुरु केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment