मोटार सायकल चोर मुद्देमालासह ताब्यात

On: July 1, 2020 7:28 PM

मालेगाव छावणी पोलिसांची कामगिरी

नाशिक:  गेल्या काही दिवसांपासून मालेगाव छावणी पोलिस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या दृष्टीने पो.नि. प्रविण वाडीले व त्यांचे सहकारी दुचाकी चोरांचा तपास करत होते.

27 जून रोजी पो.नि.प्रविण वाडीले यांना रावळगाव येथील टिल्लू गुरव नावाचा इसम हा त्याच्या ताब्यातील जुनी शाईन घेवून साठ फुटी रस्त्यावर आला असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सापळा लावला. सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने त्याचे विविध गुन्हे कबुल केले. त्याच्या ताब्यातून 4 शाईन मोटार सायकल, 1 स्प्लेंडर प्रो, 1 स्प्लेंडर प्लस, 1 स्प्लेंडर व 1 एचएफ डीलक्स अशा एकुण 8 मोटारसायकल असलेला 2 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या तपासकामी पो.ना. रविराज गवंडी, नितीन बारहाते, संजय पाटील, संदिप राठोड व नेरपगार तसेच महेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment