स.पो.नि. सचिन वाझे निलंबीत

On: March 15, 2021 2:10 PM

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयए अटकेतील स.पो.नि. सचिन वाझे यांना पोलिस खात्यातून निलंबीत करण्यात आले आहे. स.पो.नि. सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी अटक केल्यानंतर त्यांची कसुन चौकशी सुरु आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेले स्कॉर्पिओ वाहन मिळून आल्याप्रकरणी तपासाची धुरा स.पो.नि. सचिन वाझे यांच्याकडे होती. काही दिवसांनी त्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघड झाले. तेव्हापासून स.पो.नि. सचिन वाझे वादात सापडले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment