साडी नेसून चो-या करणा-याने वाचला गुन्ह्याचा पाढा

On: March 16, 2021 1:10 PM

अहमदनगर (कोपरगाव) :साडी नेसून चो-या, घरफोड्या करणारा जळगाव जिल्ह्यातील चोरटा कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात असून त्याने आपल्या गुन्ह्यांचा पाढा वाचला आहे. संजय अर्जुन पाटील (40) शिरुर नाका शिवाजीनगर अमळनेर जिल्हा जळगाव असे कोपरगाव पोलिसांच्या ताब्यातील चोरट्याचे नाव आह

त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणी घरफोडीतील रक्कम जप्त करण्यात आली आहे. संजय पाटील याने राहता येथील दुकानात चोरी केल्याचे पोलिस तपासात कबुल केले आहे. 1 मार्चच्या रात्री त्याने कोपरगाव येथील येवला रस्त्यावरील चंद्रहास पैठणी, कोपरगाव साडी सेंटर, यामाहा बाइक तसेच समर्थ इलेक्ट्रिकल या चार दुकानांमधे चोरी केली होती. या चोरीत त्याने एकुण 52 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली होती. मनोज लक्ष्मीनारायण जोशी यांच्या फिर्यादीनुसार कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नागरे यांच्यासह कर्मचारी दिलीप तिकोणे, सचिन शेवाळे, राजू पुंड, सूरज अग्रवाल, राम खारतोडे यांनी याप्रकरणी कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment