जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा येथे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या अखत्यारीत जुगाराची धाडसी कारवाई करण्यात आली. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता कु-हा धुपेश्वर मार्गावरील हॉटेल राजेंच्या वरील हॉल मध्ये जुगाराची सदर धाडसी कारवाई करण्यात आली.या कारवाईत 51 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. 2 लाख 59 हजार 220 रुपये रोख, चार चाकी सहा, दुचाकी दहा वाहने, 51 मोबाईल फोन असा एकूण 34 लाख 53 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे..
पोलीस आधिक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी
यांनी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिका-यांना जुगारावर कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली. जळगाव उप विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंता यांच्या अखत्यारीत सहायक पोलिस अधीक्षक तथा बाजारपेठ पोलिस स्टेशनचे प्रभारी आर्चित चाँडक तसेच प्रो.डीवायएसपी नितीन गणापुरे, वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी आधिकारी , स.पो.नि.अनिल मोरे, पो.हे.कॉ.अय्याज सय्यद, पो.ना.समाधान पाटील, पो.कॉ. ईश्वर भालेराव, पो.का. प्रशांत सोनार, पो.कॉ. हेमंत जांगडे, पो.कॉ. प्रकाश कोकाटे, विजय अहिरे व आरसीपी क्र.२ भुसावळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.