वाझे साहेबच प्रमुख आहेत……….. मनसुख हिरेन व त्यांचा भाऊ विनोद यांच्यातील संभाषण एनआयए कडे?

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासाचा टप्पा जवळपास पुर्ण झाला आहे. राज्य दहशतवाद पथक याप्रकरणी लवकरच अधिकृत माहिती देऊ शकते. या प्रकरणी निलंबीत पोलिसासह बुकीला अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान मनसुख हिरेन आणि त्यांचा भाऊ विनोद हिरेन यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाची रेकॉर्डींग एटीएस आणि एनआयए कडे आली असल्याचे समजते. या संभाषणात झालेले बोलणे पुढीलप्रमाणे असल्याचे म्हटले जात आहे.

विनोद : झोप झाली का? काय झालं?
मनसुख- माझा जबाब नोंदवून घेतला. आता पुन्हा जावं लागणार नाही.
विनोद- जबाबात काय लिहून घेतलं? ती गाडी सचिन वाझेही चालवायचे हे जबाबात सांगितलंस ना?
मनसुख- नाही, मी जबाबात तसं म्हटलं नाही.
विनोद- का नाही सांगितलंस?
मनसुख- ती गाडी मी चालवतो हे कोणालाही सांगू नकोस, असं सचिन वाझेंनी सांगितलं होतं. त्यामुळे मी जबाब नोंदवताना तशी माहिती दिली नाही.
विनोद- तू ही गोष्ट चुकीची केलीस. यामुळे कोणती गडबड तर होणार नाही ना?
मनसुख- काही नाही होणार, हे प्रकरण साहेबांकडेच आहे.
विनोद- एटीएसचं पथकही चौकशी करताना तुला माहिती विचारेल.
मनसुख – साहेबांकडे (सचिन वाझे) सर्व पेपर आहेत. साहेबच प्रमुख आहेत. आता पुढे काही होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here