अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी तिन दिवस अगोदर नोटीस द्या – उच्च न्यायालयाचे आदेश

टीआरपी घोटाळ्याचा तपास तिन महिन्यात पुर्ण करण्याची ग्वाही राज्य शासनाने उच्च न्यायालयास दिली आहे. याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत काही आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तिन दिवस अगोदर नोटीस दिल्यानंतर अर्णब गोस्वामी यांना अटक करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

अर्णब गोस्वामी आणी चॅनलची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मिडीया या कंपनीची याचिका न्यायालयाने दाखल केली आहे. न्यायालयाने कारवाईपासून आतापर्यंत देण्यात आलेला दिलासा रद्द केला आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या आरोपपत्राला आव्हान देण्यासह कारवाईपासून संरक्षण मिळावे, तपास सीबीआयकडे देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी अर्णब गोस्वामी व एआरजी आउटलियर मिडीया कंपनीकडून याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष चितळे यांच्या खंडपिठासमक्ष सुनावणी सुरु आहे. बारा आठवड्यात तपास पुर्ण करण्यात येईल असे राज्य सरकारकडून न्यायालयास सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने म्हटले आहे की अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेच्या कारवाईपुर्वी तिन दिवस अगोदर नोटीस द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here