जळगाव : तलवारीच्या बळावर दहशत माजवणा-या तरुणास तलवारीसह रामेश्वर कॉलनी परिसरातील सिद्धार्थ नगर भागातून एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. लखन समाधान सपकाळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध रितसर कायदेशीर कारवाई करत अटक करण्यात आली आहे.
पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. किशोर पाटील, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील असे गस्त घालत असतांना मिळालेल्या माहीतीनुसार त्यांनी लखन सपकाळे यास तलवारीसह ताब्यात घेत अटक केली.
या प्रकरणी पो.कॉ. मुकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 256/21 आर्म अॅक्ट कलम 4/25 भा.द.वि. 188, 269 नुसार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.