बंद घरातून 65 हजार रुपयांची चोरी

जळगाव : घरी कुणी नसल्याचे बघून बंद घराचा कडी कोंडा तोडून घरातील 65 हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी हद्दीतील एकनाथ नगर – रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी सिताराम राठोड हे त्यांच्या पत्नीसह त्यांच्या भावाची तब्येत बघण्यासाठी 5 मे रोजी सायंकाळी गेले होते. जातांना 65 हजार रुपयांची पर्स त्यांनी घरातील पत्र्याच्या कोठीत ठेवली होती. त्या रात्री ते भावाच्या घरी मुक्कामी राहीले. दुस-या दिवशी सकाळी घरी परत आल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसून आला. घरातील पत्र्याच्या कोठीत ठेवलेली रक्कम देखील गायब दिसली. तसेच पैसे ठेवलेली रिकामी पर्स पलंगावर पडलेली दिसून आली. काही दिवसांपुर्वी प्लॉट विकून आलेली रक्कम चोरी झाल्यामुळे या प्रकरणी सिताराम राठोड यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा रितसर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here